
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याने यूएस ओपन २०२३ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा ६-३, ७-६ (५), ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. वयाच्या ३६ व्या वर्षी अमेरिकन ओपन जिंकून त्याने इतिहास घडवला आहे.
ओपन एरामध्ये जोकोविच सर्वात जास्त वयात अमेरिकन ओपन जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे. जोकोविचने एकाच हंगामात चारवेळा तीन ग्रँड स्लॅम जिंकण्याची कामगिरी केलीय. त्याने २०११, २०१५, २०२१ आणि २०२३ मध्ये तीन ग्रँड स्लॅम जिंकली आहेत.
टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तृतिय मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले.
जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर दुसरा सेट जोकोविच आणि तृतीय मानांकित रशियाच्या मेदवेदेव यांच्यात एक तास ४४ मिनिटे चुरशीची लढत झाली. जोकोविचने हा सेट ७-६ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने मेदवेदेवचा ६-३ असा पराभव करत विजय मिळवला.
जोकोविचने अमेरिकन ओपन जिंकल्यानतंर म्हटले की,‘या खेळात इतिहास घडवणे खरंच विशेष आहे. मी कधीच विचार केला नाही की २४ ग्रँड स्लॅमबाबत इथे बोलेन. पण काही वर्षांपूर्वी मला वाटले की माझ्याकडे संधी आहे." टेनिसमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या बाबतीत सेरेना विल्यम्सच्या २३ ग्रँड स्लॅमचा विक्रम मागे टाकत जोकोविचने माजी टेनिसस्टार मार्गरेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅमची बरोबरी केली आहे.
कोको गॉफने पटकावलं विजेतेपद
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफ हिने महिला एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेंकाला नमवून विजेतेपद पटकावले. कोको गॉफने तिचे पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. विम्बल्डनमध्ये तिला पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले होते. गेल्या वर्षी तिला फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र गेल्या १९ सामन्यात तिने दमदार कामगिरी करत १८ सामने जिंकले आहेत. सेरेना विल्यम्सनंतर अमेरिकन ओपन जिंकणारी ती पहिली अमेरिकन टीनएजर आहे.
अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर कोको गोफने टीकाकारांना उत्तर दिले. ती म्हणाली की, त्या लोकांचे आभार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. एक महिन्यापूर्वी एक टूर जिंकली होती. तेव्हा मी तिथेच थांबेन म्हणाले. दोन आठवड्यापूर्वी आणखी एक टूर जिंकली, तेव्हा म्हणाले की गॉफचे हेच मोठे विजेतेपद असेल. आता तीन आठवड्यांनी मी या ट्रॉफीसोबत इथे उभा आहे.