IND vs ENG : भारतीय संघावर करोनाचे सावट, पंत पाठोपाठ आणखी एकाला करोनाची बाधा

IND vs ENG : भारतीय संघावर करोनाचे सावट, पंत पाठोपाठ आणखी एकाला करोनाची बाधा

दिल्ली | Delhi

भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे.

विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंत (Rishbah Pant) करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या आणखी एका सदस्याला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतसह आणखी चार सदस्य इतर संघासोबत डरहमला जाऊ शकणार नाही. यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंच आहेत. या चौघांची नावं अजून समोर आलेली नसून हे तिघेही इतर संघातील खेळाडूप्रमाणेच WTC Final नंतर मागील २० दिवसांपासून इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत.

इंग्लंड क्रिकेट संघावर करोनाचं सावट असतानाच भारतीय खेळाडूलाही करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. इंग्लंड संघाची नुकतीच पाकिस्तानविरोधात एकदिवसीय मालिका पार पडली. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्याआधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघातील सात सदस्यांना करोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू आणि चार कर्मचारी असल्याची माहिती दिली होती. यामुळे इंग्लंड संघात बदल करण्यात आले आणि बेन स्टोक्सकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज

१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स

२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले

२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल

१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com