आदिवासी विकास विभाग : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागाला विजेतेपद

आदिवासी विकास विभाग : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागाला विजेतेपद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिवासी विकास विभागातर्फे ( Tribal Development Department)आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद नाशिक विभागाने पटकावले. तर द्वितीय विजेते पद नागपूर विभाग आणि तृतीय विजेतेपद ठाणे विभागास मिळाले

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

रविवारी (दि.१२) समारोप कार्यक्रमप्रसंगी आयुक्त नयना गुंडे,आयुक्तालयचे अपर आयुक्त तुषार माळी,नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत आणि अमरावती विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, आयुक्तालायाचे उपायुक्त अविनाश चव्हाण,नाशिकचे उपायुक्त सुदर्शन नगरे, ठाणे चे उपायुक्त प्रदीप पोळ, पेणच्या प्रकल्पअधिकारी शशिकला अहिरराव, कळमनुरीचे प्रकल्पअधिकारी छंदक लोखंडे, अकोलाचे प्रकल्पअधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे आणि पुसदचे प्रकल्पअधिकारी आत्माराम धाबे, महाराष्ट्र पोलिस अकॅडमीचे संचालक शिवाजी पवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपर आयुक्त (मुख्यालय) तुषार माळी यांनी पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेचे अहवाल वाचन केले.14,17 आणि 19 वर्ष वयोगटासाठी कबड्डी,खोखो, हॅन्डबॉल,व्हॉलीबॉल, रिले या सांघिक तसेच वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा मुले आणि मुली यांच्यासाठी आयोजित करण्यात आल्या. ह्यावेळी 102 सांघिक बक्षीसे आणि 64 सुवर्णपदके,64 रौप्य पदके आणि 64 कंस्यपदके देण्यात आली. चारही विभाग मिळून 1821 विद्यार्थी ह्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. यात सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांक नाशिक विभाग, द्वितीय विजेते पद नागपूर विभाग आणि तृतीय विजेतेपद ठाणे विभागास मिळाले.

आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या, " आपले आदिवासी विद्यार्थी खूप चुरशीने खेळतात. भविष्यात नक्कीच आपल्या देशाचे नाव तुम्ही उंचावणार याचा मला विश्वास आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागच्या स्पर्धामध्ये सहभागी होता येईल या दृष्टीने विभाग आणि आम्ही प्रयत्नशील आहोत. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनी मधून अधिकाधिक विद्यार्थी शास्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. त्यात तुम्हीही यावे. स्पर्धा संपल्या म्हणजे झाले असं न समजता वर्षभर सराव ठेवावा. भविष्यात पोलिस तसेच पोलिस अधिकारी नक्कीच व्हाल. " असे म्हणत खेळाचे करियरच्या दृष्टीने महत्व पटवून दिले.

समारोप्रसंगी अमरावती विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तीत आणि खिलाडू वृत्तीने खेळल्याबाबत अभिनंदन केले. तसेच हार मिळाल्यावर नव्या जिद्दीने उभे राहण्याबाबत प्रेरणा दिली.

नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी क्रीडा प्रबोधिनी बाबत माहिती सांगितली.यासोबतच दिलीप गावित या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.आभार सहायक प्रकल्पअधिकारी वर्षा सानप यांनी मानले. सूत्रसंचालन लासूरे आणि गाढवे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com