Tokyo Olympics : पी व्ही सिंधू तिसऱ्या फेरीत तर महिला हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव

Tokyo Olympics : पी व्ही सिंधू तिसऱ्या फेरीत तर महिला हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव

दिल्ली | Delhi

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाला (Indian women hockey team) सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र टोकिया ऑलिम्‍पिकमध्‍ये (Tokyo Olympics) भारताची अन्‍य खेळांमध्‍ये निराशाजनक कामगिरी होत असताना बॅडमिंटनपटू पी व्‍ही सिंधू (PV Sindhu) हिने आपली विजयाची मालिका कायम ठेवली. सलग दुसरा विजय नोंदवत पी व्‍ही सिंधू तिसर्‍या फेरीत पोहचली.

ग्रेट ब्रिटनच्या संघाने (Great Britain Team) भारतीय महिला संघाचा (Indian women hockey team) ४-१ च्या फरकाने पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. या पराभवामुळे भारताचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग आणखीन खडतर झालाय. आता भारतीय महिला संघाला त्यांचे पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. भारतीय संघाचे पुढील सामने आयर्लण्ड आणि रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका (Ireland and the Republic of South Africa) संघाविरुद्ध होणार आहेत. आजच्या पराभवामुळे भारताची गोल्सची संख्या उणे ९ इतकी झालीय. शर्मिला देवीने (Sharmila Devi) पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करत आजच्या सामन्यात भारतातर्फे एकमेव गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी हान मार्टीनने दोन तर लिली ओस्ले आणि ग्रेस बाल्सडोनने प्रत्येकी एक असे एकूण चार गोल नोंदवले.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पी व्‍ही सिंधूचं (Star badminton player PV Sindhu) उत्तम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सिंधूनं पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. पी व्‍ही सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयानं केली होती. त्यानंतर तिचा दुसरा सामना हाँगकाँगच्या च्युंग एनगान (Cheung Ngan Yi of Hong Kong) सोबत होता. या सामन्यात सिंधूनं तिचा सहज पराभव केला. पी व्‍ही सिंधूनं हाँगकाँगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये २१-९, २१-१६ नं पराभूत केलं. देशाला सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com