
टोकियो / Tokyo - जपानची राजधानी टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पी व्ही सिंधूने क्वार्टरफायनलमध्ये जपानच्या आकणे यामागुचा पराभव केला आहे. सिंधूच्या विजयामुळे भारताच्या आणखी एका मेडलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.