Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाचा पराभव, पण...

Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाचा पराभव, पण...

दिल्ली | Delhi

टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळातील महिला हॉकी सेमीफायनल सामन्यात भारत (India) आणि अर्जेन्टिना (Argentina) यांच्यातील मॅच खूपच अटीतटीची झाली.

भारतीय हॉकी टीमला अर्जेन्टिनाने २-१ ने पराभूत केलं आहे. यासह पुरुष संघानंतर महिला हॉकी (Men's Hockey Team) गोल्ड मेडलचे स्वप्न देखील भंग झाले आहे. पण या पराभवानंतरही भारतीय संघाला कांस्यपदक पटकावण्याची संधी नक्कीच आहे. ग्रेट ब्रिटन विरुद्ध पदक जिंकण्याची त्यांच्यासमोर शेवटची संधी असेल.

भारतीय महिला हॉकी संघाने आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने गोल करत धडाकेबाज सुरुवात केली होती. गुरजीत सिंग कौरने भारतीय महिला संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

सुरुवातीच्या क्षणात मिळालेली ही आघाडी भारतीय महिला संघाला फार काळ टिकवून ठेवता आली नाही. तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर अर्जंटिनाने गोल डागत १८ व्या मिनिटाला सामना १-१ असा बरोबरीत आणला.

हाफ टाइममध्ये दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. दुसऱ्या हाफनंतरच्या खेळात सामन्यातील ३६ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने पेनल्टी कॉर्नर सार्थी लावत दुसरा गोल नोंदवला. बॅरिओन्यूव्होच्या या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने २-१ अशी आघाडी घेतली.

भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता. त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय संघानं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com