Tokyo Olympics : आज भारत-पाकिस्तान भिडणार!, सुवर्ण पदकासाठी होणार महामुकाबला

Neeraj Chopra/Arshad Nadeem
Neeraj Chopra/Arshad Nadeem

दिल्ली | Delhi

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakisthan) यांच्यात क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर अनेक रोमांचक सामने झाले आहेत. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (INDvsPak) यांच्यात जोरदार सामना होणार आहे, पण हा सामना क्रिकेटच्या खेळपट्टीवर नसून भाला फेकण्याच्या (men’s javelin final) मैदानावर असेल.

Neeraj Chopra/Arshad Nadeem
Neeraj Chopra/Arshad Nadeem

दरम्यान टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकली आहेत. (india at olympics 2021) आज (शनिवार) होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीमधून (javelin final) भारताला सुवर्णपदकाची (Gold medal) अपेक्षा असेल.

मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून (Pakisthan) कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Indian javelin thrower Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघंही या फेरीत पदकासाठी प्रतिस्पर्धी आहेत. भालाफेकीच्या अंतिम लढतीला आज (शनिवार) संध्याकाळी ४.३० पासून सुरुवात होईल.

Neeraj Chopra/Arshad Nadeem
Neeraj Chopra/Arshad Nadeem

तर दुसरीकडे पाकिस्तानकडून अर्शद नदीम (Arshad Nadeem) हा खेळाडूही अंतिम फेरीत पात्र ठरला आहे. त्यामुळे हे दोघंही आता पदकासाठी आपला सर्वोत्तम खेळ दाखवतील. अर्थात त्यामुळेच तमाम क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यात भर म्हणून भारत आणि पाकिस्तान (IndiavsvsPakisthan) हे पारंपरिक स्पर्धक असल्याने सर्वांचं लक्ष या फेरीकडे लागलं आहे.

Neeraj Chopra/Arshad Nadeem
Neeraj Chopra/Arshad Nadeem

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Star Indian javelin thrower Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympics) आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं होतं. नीरजची ही कामगिरी 'अ' व 'ब' या दोन्ही गटांतून अव्वल ठरली. त्यामुळे नीरजला आज होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे (Final match) तमाम देशवासीयांच्या नजरा असतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com