Tokyo Olympics : शेतकऱ्याचा मुलगा ठरला सर्वांसाठी आदर्श; जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास...

Tokyo Olympics : शेतकऱ्याचा मुलगा ठरला सर्वांसाठी आदर्श; जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास...

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारताने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात इतिहास रचला आहे. २३ वर्षीय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे.

नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाचा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा प्रवास जाणून घ्या...

नीरज साधारण १० वर्षांचा असताना त्याचे वजन अधिक होते. नीरजचे वजन कमी करण्यासाठी त्याला पानिपतच्या शिवाजी स्टेडियमवर त्याचे वडील व काकांनी पाठवले. शिवाजी स्टेडियमवर नीरजला अनेक खेळ शिकविण्यात आले.

त्याचे जास्त वजन असल्याने तो वेगाने धावू शकत नव्हता. उंच उडी तसेच लांब उडी मारणे त्याला अत्यंत कठीण जात असे. एक दिवस नीरज त्याच्या मित्रांसोबत फिरताना त्याने काही खेळाडूंना भाला फेकताना पाहिले. त्याने गंमत म्हणून भाला उचलला आणि तो फेकला.

Tokyo Olympics : शेतकऱ्याचा मुलगा ठरला सर्वांसाठी आदर्श; जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास...
Tokyo Olympics :भालाफेकमध्ये नीरज चोप्राने घडवला इतिहास, भारताला पहिले सुवर्णपदक

त्याने फेकलेला भाला पाहून आजूबाजूचे सर्व खेळाडू स्तब्ध झाले होते. केवळ ११ वर्षांच्या नीरजने भाला 25 मीटरपेक्षा अधिक दूर फेकला होता. याच दिवशी नीरज चोप्रा भालाफेक खेळासाठी बनला आहे हे सर्वांना समजले.

या काळात जेवलीन थ्रोच्या भाल्याची किंमत सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत होती. अखेर नीरजच्या हातात एक स्वस्त भाला आला परंतु त्याचा खेळातील आत्मविश्वास अमूल्य होता. नीरजने भाला फेकण्याचा सराव तासनतास करू लागला.

नीरज चोप्राकडे सुरुवातीच्या काळात प्रशिक्षकदेखील नव्हते परंतु त्याने हार मानली नाही. नीरज चोप्राने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून भाला फेकण्याचे प्रशिक्षण घेऊ लागला.

भालाफेकीचे दररोज वेगवेगळे व्हिडीओ बघून तो शेतात त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर नीरजने यमुनानगरमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.ज्यामुळे तो आज करोडो लोकांसाठी आदर्श ठरला आहे.

2013 साली नीरजने जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. युक्रेनमध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राची कामगिरी निराशाजनक ठरली. या स्पर्धेत तो 19 व्या स्थानावर राहिला. स्पर्धेत तो केवळ 66.75 मीटरपर्यंत फेकू शकला.

वुहानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये नीरजने 70.50 मीटर अंतरावरून भालाफेक करून नववे स्थान प्रप्र्ता केले. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 82.23 मीटर अंतरासह भालाफेक करीत सुवर्णपदक कमवले.

Neeraj Chopra
Neeraj Chopra

त्याच वर्षी नीरज चोप्राने वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटरवर भालाफेकमध्ये जागतिक विक्रम केला. नीरज चोप्राने सुवर्ण जिंकल्याने तो प्रकाशझोतात आला. 2017 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने 86.47 मीटरच्या भालाफेकाने देशासाठी सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली.

2018 मध्ये त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर थ्रोसह पुन्हा एकदा सुवर्ण जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यासाठी नीरजला अनेक धोकादायक दुखापातींसह करोनाचादेखील सामना करावा लागला.

परंतु हार न मानता त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आज देशाचा सन्मान वाढविला आहे. त्याच्यावर संपूर्ण देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com