Tokyo Olympics 2021 : टेनिस स्टार 'रॉजर फेडरर'ची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार

'हे' आहे कारण
Tokyo Olympics 2021 : टेनिस स्टार 'रॉजर फेडरर'ची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार

दिल्ली | Delhi

टोकियो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) टेनिस स्टार रॉजर फेडररने (Roger Federer) माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण खेळणार नसल्याचे रॉजर फेडररने जाहीर केले आहे. फेडररने गुढघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले आहे.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहिर करताना रॉजर फेडररने म्हटले आहे की, 'मला विम्बल्डन स्पर्धेदरम्यान दुर्देवाने माझ्या गुडघ्याला दुखापत धाली. त्यामुळे टोक्यो ऑलम्पिकमधून मी माघार घेत आहे. मी ऑलम्पिकमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करु शकणार नसल्याने मी निराश आहे. मी सध्या पुढील स्पर्धांसाठी तयारीच्या दृष्टीने सराव करत आहे आणि संपूर्ण स्वित्झर्लंड संघाला माझ्याकडून शुभेच्छा.'

दरम्यान फेडररच्या आधीच दिग्गज खेळाडू राफेन नदाल (Rafeal Nadal) आणि महिलाी चॅम्पियन सेरेना विल्यम्स (Serena Williams) यांनीही टोकियो ऑलम्पिकमधून माघार घेतली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com