Tokyo Olympics : बजरंगाची कमाल! भारताला मिळाले सहावे पदक

Bajrang Punia Win Bronze Medal
Bajrang Punia Win Bronze Medal

दिल्ली | Delhi

टोकिया ऑलिम्पिकचा (Tokyo Olympics) आज सोळावा दिवस आहे. आजचा दिवस भारतासाठी (India) आशादायक ठरला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात (Men's 65kg Wrestling) भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानं (Bajrang Punia) कास्यंपदक (Bronze Medal) मिळवलं आहे.

Bajrang Punia Win Bronze Medal
Bajrang Punia Win Bronze Medal

बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोवशी (Daulet Niyazbekov of Kazakhastan) कांस्यपदकासाठी (Bronze medal) लढत झाली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत बजरंग पुनियाने कांस्य पदकावर नाव कोरले. त्याने ८-० अशा फरकाने एकतर्फी विजय नोंदवला.

Bajrang Punia Win Bronze Medal
Tokyo Olympics : आज भारत-पाकिस्तान भिडणार!, सुवर्ण पदकासाठी होणार महामुकाबला
Bajrang Punia
Bajrang Punia

बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून (Haji Aliyev of Azerbaijan) ५-१२ ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com