Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघ इतिहास घडवणार?

आज अर्जेंटीनाशी भिडणार
Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघ इतिहास घडवणार?

दिल्ली | Delhi

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाने इतिहास रचत उपांत्य फेरी गाठली आहे. आता सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाला (Argentina) हरवून फायनलमध्ये प्रवेश करण्याचं उद्दिष्ट भारताच्या महिला हॉकी संघाने (Indian Women Hockey Team) ठेवलं आहे.

आत्मविश्वासाने भारलेल्या १८ सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी ऑस्ट्रेलियाला (Australia) १-० असा अनपेक्षित धक्का दिला. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरचे ड्रॅग-फ्लिकर (Penalty Corner) गुर्जित कौरने गोलमध्ये रूपांतर करीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले. ४१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय महिला हॉकी संघाने प्रथमच हा पराक्रम केला.

दरम्यान भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष संघ जो टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरलं तो टप्पा ओलांडण्यासाठी महिला संघ आतूर आहे. भारतीय महिला संघ केवळ तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. (India vs Argentina Women's Hockey Semifinal Match Live)

१९८० मध्ये मॉस्को इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघ पहिल्यांदा क्रीडाविश्वातल्या या सर्वोच्च स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघाला ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भारतीय महिला संघाला एकही सामना जिंकता आला नाही. गटात तळाशी राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.

यंदाही भारतीय संघाची ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात निराशाजनकच झाली. महिला संघाने सलग तीन सामने गमावले. पण ग्रुप स्टेजमधील अखेरचे दोन सामने जिंकत भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता ऑस्ट्रेलियाला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने आज सेमीफायनल्ससाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी सदस्य आणि ऑलंपियन जगबीर सिंह यांनी माध्यमांना सांगितलं की, अर्जेंटीनाचे खेळाडू अनेकदा आक्रमक होत हॉकी खेळताना दिसून येतात. अशातच आपल्या खेळाडूंनाही आक्रमक खेळी करावी लागले. त्यांचं म्हणणं आहे की, सामन्यादरम्यान भारतीय संघाला अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवावे लागतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com