Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने

मुंबई | Mumbai

आजपासून (दि. ३० ऑगस्ट) आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेची सुरुवात होत असून या स्पर्धेचे उद्घाटन आज भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता मुलतान (Multan) येथे होणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे सर्व सामने होणार असून ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने (Hybrid Method) खेळवली जाणार आहे...

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने
Fire News : हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

आशिया चषकाच्या सामन्यांचे पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan and Sri Lanka) येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेत १३ सामने खेळविण्यात येणार असून सर्व सामने ५० षटकांचे होणार आहेत. यातील सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ (Pakistan and Nepal) यांच्यात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने
Accident News : स्कॉर्पिओची कंटेनरला धडक; सात जणांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

दरम्यान, आशिया चषकातील सहा संघांची २ गटात विभागणी करण्यात आली असून राऊंड रॉबीनमध्ये हे सामने होणार आहेत. तसेच दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर फोअरमध्ये पात्र ठरतील. यानंतर सुपर फोअर पण राऊंट रॉबीनमध्ये होईल आणि दोन संघ फायनल सामना खेळतील.

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने
Ajit Pawar : "आम्ही गोट्या खेळायला आलो का?”; शिंदे-फडणवीसांसमोरच अजित पवारांचा प्रश्न

आशिया चषक उद्घाटन समारंभ आणि सामने यांचे थेट प्रक्षेपण भारतात कोठे असेल?

आशिया चषक उद्घाटन सोहळा स्टार स्पोर्ट्सद्वारे भारतात थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतातील आशिया कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण देखील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर टीव्हीवर पाहता येणार आहे. त्याचवेळी, विनामूल्य डीटीएच वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने पाहू शकतील. या वाहिनीवर अंतिम सामनाही प्रसारित केला जाणार आहे.

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने
BARC Scientist Suicide : भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह

आशिया चषक उद्घाटन समारंभ आणि सामन्यांचे थेट प्रवाह भारतात कुठे उपलब्ध असेल?

आशिया चषक उद्घाटन समारंभ हॉटस्टारवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. चाहते त्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात. हॉटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना आशिया कपचे सर्व सामने विनामूल्य पाहता येणार आहेत.

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने
तुमचा जोश आता हाय नाही का?; प्रकाश आंबेडकर यांचा PM मोदींवर हल्लाबोल

सर्व संघांचे कर्णधार असे

भारत : रोहित शर्मा, पाकिस्तान : बाबर आझम, श्रीलंका : दसून शनाका, बांगलादेश : शाकिब अल हसन, अफगाणिस्तान : हशमतुललाह शाहिदी, नेपाळ : रोहित पाउंडेल

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सलिल परांजपे, नाशिक.

Asia Cup 2023 : आज आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा; चाहत्यांना 'या' ठिकाणी पाहता येणार सर्व सामने
“मोदी खोटं बोलत होते, संपूर्ण लडाखला माहितीये की…”, चीनचा उल्लेख करत राहुल गांधींचं टीकास्र
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com