चोपडा, कोटेचा व वाणी यांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

चोपडा, कोटेचा व वाणी यांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केरळ (Kerla) येथे होणा-या ८३ व्या जूनियर व युथ राष्ट्रीय टेबल टेनिस (junior & youth table tennise competition) अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या तनिशा कोटेचा (Tanisha Kotecha), सायली वाणी (Sayali wani) व कुशल चोपडा (Kushal Chopda) यांची महाराष्ट्र संघात निवड झाली.....

या वर्षी कुशल चोपडा यांची १५, १७ व १९ वर्षाखालील वयोगटातील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. एका सिझनमध्ये तीन संघात निवड झालेला नाशिकचा पहीला पुरुष खेळाडू आहे. कुशल चोपडा हा १५, १७ व १९ वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्रात अनुक्रमे प्रथम, दूसरा व चौथा मानांकित खेळाडू आहे तर राष्ट्रीय स्तरावर त्याला १५ वर्षा खालील गटात तीसरे मानांकन आहे. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर कुशलला १७६ वे मानांकन आहे.

यावर्षी तनिशा कोटेचा व सायली वाणी यांची महाराष्ट्राच्या १७, १९ व महिला गटाच्या संघात निवड झाली. एका सिझनमधे तीन तीन संघाचे प्रतिनिधित्व करणा-या त्या दोघी नाशिकच्या पहील्या महिला खेळाडू आहेत.

तनिशा ही सध्या राज्यात १७ व १९ वयोगटात अनुक्रमे दूस-या व तिस-या स्थानावर असून तर राष्ट्रीय स्तरावर चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. सध्या ती जागतिक क्रमवारीत अनुक्रमे त्रेचाळीस व सत्याहत्तर स्थानावर आहे.

सायली वाणी हीला १७ व १९ वयोगटात महाराष्ट्रात अनुक्रमे तीसरे व दूसरे मानांकन असून, राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे बत्तीस व चोवीसावे मानांकन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायलीला अनुक्रमे श्याहशी व एकशे एकोणचाळीस हे मानांकन आहे.

तनिशा कोटेचा (Tanisha Kotecha) हीने नुकत्याच दोहा, ऑस्ट्रीया, जर्मनी व स्पेन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत भाग घेतला होता. सायली वाणी हीने २०२१ मधे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षाखालील वयोगटात अजिंक्यपद मिळविले होते. तसेच सायलीने युथ जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करून ब्रॉझ पदक पटकावले होते.

याशिवाय सायली ही नुकत्याच जर्मनी व स्पेन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी यूथ कंडेंडर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. नुकत्याच ऑस्ट्रीया येथे झालेल्या १५ वर्षाखालील वयोगटात कुशल हा डब्ल्यूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत सहभागी झाला होता.

त्यामध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. यावर्षी झालेल्या राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षाखालील वयोगटात त्याने आजवर ४ कांस्यपदक पटकावले आहेत. नासिकचे हे तिन्ही खेळाडू प्रशिक्षक जय मोडक यांचे मार्गदर्शना खाली सराव करत आहे.

या तिन्ही खेळाडूंचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी, नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शिरगावकर यांनी केरळ येथे होणा -या राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करतांना सांगितले की उदयोन्मुख खेळाडूंसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी संघटनेच्या वतीने कायमस्वरूपी धोरण भविष्यात आखण्यात येणार आहे.

तसेच खेळाडूंना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय होणा-या विविध स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी झाले पाहिजे ज्यामुळे आपल्याला खेळातील नवीन नवीन तंत्र आत्मसात करता येतात तसेच विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळते.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान कुठे आहेत हे समजते आणि सध्या असलेल्या जागतिक स्तरावरील आपले असलेले स्थानापेक्षा अजून वरचे स्थान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी मेहनत करून वरचे स्थान प्राप्त करता येते.

याप्रसंगी नाशिकजिल्हा टेबल टेनिस संघटनेचे (nashik district table tennis sanghatna) अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष मिलिंद कचोळे, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, हेमंत पाटील, आबा झोडगे , हेमंत इंगळे, गफार पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com