टीम इंडियाला मोठा झटका! 'हा' खेळाडू आशिया चषक मुकणार

टीम इंडियाला मोठा झटका! 'हा' खेळाडू आशिया चषक मुकणार

मुंबई | Mumbai

आशिया चषक २०२२ चं (Asia Cup 2022) आयोजन यूएईत (UAE) करण्यात येणार आहे. २७ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एकूण ६ संघ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध दोन हात करणार आहे. आज सोमवारी ८ ऑगस्ट रोजी ७ वेळच्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात येणार आहे...

संघामध्ये लोकेश राहुल, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचं कमबॅक अपेक्षित आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे कायम असणार आहे. त्यामुळे आशिया चषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मात्र आशिया चषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघापुर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय टी २० संघाचा (T20 Team) स्टार गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्या टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेतील त्याच्या सहभाग अनिश्चित मानला जात आहे.

दुखापतीमुळे भारतीय संघाचा सदस्य असलेला हर्षल नुकत्याच विंडीजविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतही एकाही सामन्यात खेळू शकला नव्हता.

हर्षल पटेल भारतीय गोलंदाजीचा हुकमी एक्का आहे. मागील काही सामन्यांतून भारतीय संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी २० मालिकेत त्याने भारतीय संघातून पदार्पण केले होते.

त्याने भारताकडून आतापर्यंत एकूण १७ टी २० सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. हर्षलला दुखापत झाल्यामुळे आशिया चषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात कोणाला संधी द्यायची हा मोठा पेच भारतीय संघनिवड समितीसमोर निर्माण झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com