आयपीएल मध्ये तिसरा डबल हेडर; 'हे' संघ आमने सामने

आयपीएल मध्ये तिसरा डबल हेडर; 'हे' संघ आमने सामने

नवी दिल्ली | New Delhi

आयपीएल १६ मध्ये आज डबल हेडर (Double header) सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) संघांमध्ये गुवाहाटीच्या बरसापारा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्पर्धेतील तिसरा सामना असणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे २ सामन्यांमध्ये १ विजय आणि १ पराभवासह २ गुण आहेत. आयपीएल गुणतालिकेत सध्या राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे.

आयपीएल मध्ये तिसरा डबल हेडर; 'हे' संघ आमने सामने
गौरवास्पद! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी घेतली सुखोई-३० एमकेआयमधून भरारी

राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद संजू सॅमसन सांभाळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद डेविड वॉर्नरकडे असणार आहे .

मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्ज आज दुसरा सामना

आयपीएल १६ मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. मुंबई संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधारपद धोनीकडे असेल.

आयपीएल मध्ये तिसरा डबल हेडर; 'हे' संघ आमने सामने
'अब रूल पुष्पा का'; 'पुष्पा २'च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा

आयपीएल १६ मध्ये मुंबई संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. सलामी सामन्यात मुंबईला बंगळूर संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाने अहमदाबाद येथील सलामी सामना पराभूत झाल्यावर जबरदस्त कमबॅक केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

चेपॉक येथील लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईने १२ धावांनी थरारक विजय संपादन करून विजयी लय प्राप्त केली आहे. आता स्पर्धेतील दुसरा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल ४ स्थानांमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी चेन्नई सज्ज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com