IPL : २०२३ पासून आयपीएल सामन्यांच्या वेळेत होणार बदल

IPL : २०२३ पासून आयपीएल सामन्यांच्या वेळेत होणार बदल
आयपीएल

मुंबई | Mumbai

आयपीएल १५ (IPL 15) चा हंगाम संपण्यासाठी अवघे ७ सामने शिल्लक राहिले आहेत. अशातच बीसीसीआयने (BCCI) आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या हंगामाची तयारी सुरु केली आहे...

पुढील वर्षांपासून आयपीएलचे (IPL) दुपारचे सामने ४ वाजता आणि रात्रीचे सामने ८ वाजता खेळवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) प्लॅन आहे. सध्याच्या हंगामात हे दोन्ही सामने अनुक्रमे ३:३० आणि ७:३० या वेळेत खेळवण्यात येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल (IPL) प्रसारण हक्कांसाठी शर्यतीत सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांना बीसीसीआयने (BCCI) एक पत्र पाठवले आहे. या पत्रात आयपीएल सामन्यांची वेळ एका तासाने वाढण्यात येणार असल्याचा उल्लेख बीसीसीआयने केला आहे.

आयपीएल २०२३-२०२७ (IPL 2023 - 2027) या पाच वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठीचा लिलाव (Auction for broadcasting rights) येत्या जूनमध्ये (JUNE) होणार आहे. यामध्ये प्रसारण हक्कांसाठी अधिकार मिळवण्यासाठी अनुक्रमे हा लिलाव (Auction) १२ आणि १३ जून २०२२ रोजी होणार आहे. यासाठी ७ कंपन्या सध्या शर्यतीत असून बीसीसीआयला (BCCI) यातून अनुक्रमे ७. २ बिलियन म्हणजे ५४ हजार कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com