फुटबॉलचा थरार : उलटफेरने गाजलेली स्पर्धा आता गोल्डन बॉल, गोल्डन बूटची चर्चा

फुटबॉलचा थरार : उलटफेरने गाजलेली स्पर्धा आता गोल्डन बॉल, गोल्डन बूटची चर्चा

आनंद खरे, क्रीडा समीक्षक

22 वी फिफा विशवचषक स्पर्धा (FIFA World Cup-2022 )ही धक्कादायक निकालांनी गाजत आहे. या स्पर्धेत एक नव्हे तर बरेच उलटफेर बघायला मिळाले अगदी स्पर्धेतील साखळी सामान्यांपासून चांगलेच उलटफेर बघायला मिळाले. 32 संघांच्या या आठ गटामध्ये खेळल्या गेलेल्या 48 साखळी सामन्यापासूनच या धक्कादायक निकालाला सुरवात झाली होती.

साखळीत एकही संघाला निर्भेळ यश नाही - विश्वचषक स्पर्धेत सहभागी 32 संघांची आठ गटात विभागणी केल्यानंतर नेहमीप्रमाणे कोणत्यातरी गटाला ग्रुप ऑफ डेथ संबोधले जाते. कारण या गटात तुल्यबळ संघ असतात आणि त्यामुळे एका संघावर साखळीतं बाद होण्याची वेळ येते. या स्पर्धेत मात्र कोण त्याही गटाला ग्रुप ऑफ डेथ म्हटले गेले नाही. परंतु सर्व गटाचे चित्र जणू ग्रुप ऑफ डेथ असेच होते. त्यामुळे सर्वच गटात अपेक्षेपेक्षा वेगळे चित्र बघायला मिळाले. अ गटात नेदर्लंडला इक्वाडोरने बरोबरीत रोखले.

बी गटात इंग्लंडला यू.एस. ये. ने बरोबरीत रोखले , क गटात तर मेस्सीच्या अर्जेंटिनालासौदी अरबने पराभूत केले, ड गटात ट्युनेशियाने फ्रान्सला पराभूत केले. तर इ जपानने जर्मनी आणि स्पेन या डॉ विश्वविजेत्यांना पराभूत केले. तत्ला फ गटात मोरोक्कोने कामालाच केली. या गटात मोरोक्कोने गत 2018 च्या उपविजेत्या क्रोएशियाला बरोबरीत ऱोखले, बेल्जीयमला बाराभूत करून थेट साखळीतच गारद केले.:गंगटात कॅमेरुनने ब्राझीलला चक्क पराभूत केले. तर ह गटात दक्षिण कोरियाने उरुग्वेला बरोबरीत रोखले आणि पोर्तुगालला पराभूत केले.

या अनपेक्षित निकालामुळे एकही संघाला विजयाचे नऊ गुण मिळविता आले नाही. तर विश्वविजेता जर्मनीला आणि क्रमवारीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या बेल्जीयम या संघांना साखळीतच आपला प्रवास थांबवावा लागला. तर काही संघाचे गुण समसमान होऊनही गोल सरासरीच्या आधारे त्यांना बाद फेरीत जाण्याची संधी मिळाली. आता उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेल्या फ्रान्सला सरस गोलच्या आधारावर गटात पहिला क्रमांक मिळाला. तर स्पेन आणि जर्मनीमध्ये दुसर्‍या क्रमांकासाठी 4-4 अशी बरोबरी असून स्पेनला एक गोलच्या फरकामुळे बाद फेरी गाठता आली. ब्राझिल आणि स्विझर्लंड यांच्यातही गटात पहिल्या क्रमांकासाठी टाय झाला येथेही ब्राझीलला एक गोलने तारले.

राऊंड ऑफ 16 मध्येही उलटफेर - राऊंड ऑफ 16 च्या आठ लढतीमध्ये अपेक्षेप्रमाणे नेदरलँड, अर्जेंटिना,इंग्लंड, फ्रान्स, आणि पोर्तुगाल यांनी विजय मिळवत बाद फेरीचा पहिला अडथळा दूर केला. परंतु जपानने येथेही गत उपविजेत्या क्रोएशियाला विजयासाठी 120 मिनिटे मैदानात घाम गळायला लावला. पेनल्टी शूट आऊट पर्यंत गेलेल्या या सामन्यात क्रोएशियाला त्यांच्या गोली तारले. तर मोरोक्को या आफ्रिकन संघाने कामालाच केली आणि पेनल्टी शूट आऊट मध्ये मोरोक्कोने स्पेनला 3-0 असे पराभूत करून इतिहास रचला.

उपउपांत्य फेरीतही धक्का

उपउपांत्य फेरीच्या चार सामन्यातही वेगळे निकाल दिसून आले. अर्जेंटीना- नेदरलँड सामन्यात पेनल्टी शूट आऊटने डच संघाला घरी पाठवले तर अर्जेंटिनाला जीवदान दिले. क्रोएशिया- ब्राझील सामन्यात सर्वच खेळ क्रोएशियाच्या हाफ मध्ये होत असतांना क्रोएशियाच्या गोलीने ब्राझीलच्या नेमार आणि कंपनीला गोल करण्यापासून थोपवून धरले. तर अतिरिक्त वेळेत नेमारने गोल केल्यानंतर क्रोएशियाकडून पेटीकोव्हिकने गोल करून आपले आवाहन जिवंत ठेवले. तर पेनल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाच्या अफलातून बचावामुळे त्याने ब्राझीलचा प्रवास येथेच थांबवला. फ्रान्स- इंग्लंड या पारंपरिक यूरोप संघांच्यात बरेच चाड -उत्तर दिसून आले. 1-1 बरोबरीनंतर फ्रान्सच्या पहिल्या गोलला इंग्लंडचा स्टार हॅरी केनने अचूक पेनल्टी शूटने 1-1 असे बरोबरीत नेले. तर पुन्हा फ्रान्सकडून ऑलिव्हर ग्रॉऊंडच्या गोलमुळे 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर बरोबरीसाठी पुन्हा पेनल्टीची संधी प्राप्त झालेल्या इंग्लंडच्या स्टार हॅरी केनला पेनल्टी गोलमध्ये मारण्यात अपयश आले. आणि इंग्लंडचा खेळ खल्लास झाला.

खरा ड्रामा मोरोक्को

पोर्तुगालमध्ये बघायला मिळाला. पोर्तुगालने उपउपांत्यपूर्व सामन्यात चक्क महान खेळाडू रोनाल्ल्डोला मैदानाबाहेर ठेवले आणि नवोदित रॅमॉसला त्याच्या जागी संधी दिली. रॅमॉसने या संधीचे सोने केले आणि हॅट्रिकसह तीन गोल करून पोर्तुगालला 6 -1 असे मोठ्या फरकाने विजयी केले. त्यानंतरच्या उपउपांत्य सामन्यात मोरोक्कोविरुद्धही रोनाल्डो पहिल्या आकारा खेळाडूंमध्ये मैदानात नव्हता. या सामन्यत जिद्दी मोरोक्कोच्या आक्रमणामध्ये पूर्वार्धात नेसेरीनेने गोल करून सर्वांना चकित केले. हो आघाडी मोडून काढण्यासाठी प्रशिक्षकानी रोनाल्डोला मैदानात उतरवले. परंतु मोरोक्कोचा गोली आणि बचाव पटूंनी आपल्या गोलची आघाडी शेवट्पर्यंतपर्यंत शाबूत ठेवण्यात यश मिळवत इतिहास रचत पहिल्या चार संघा मध्ये आपले नावं समाविष्ट केले. मोरोक्को हा पहिल्या चारमध्ये दाखल झालेला पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com