फुटबॉलचा थरार : 32 देश एक मिशन

फुटबॉलचा थरार :  32 देश एक मिशन

आनंद खरे, क्रीडा समिक्षक

सर्व क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची वाट बघत आहेत त्या 23व्या फुटबॉल विश्वचषकाचा (23rd Football World Cup)थरार आज (दि.20)पासून सुरू होत आहे. 211 देश जोडलेल्या फुटबॉलच्या सर्वोच्च संघटनेच्या म्हणजे फिफाच्या( FIFA) वतीने आयोजित या स्पर्धेचा थरार पूर्ण महिनाभर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

ऑलिम्पिक या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेनंतर सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारी स्पर्धा म्हणजे फुटबॉलचा हा कुंभमेळा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सन 1930 ला सुरुवात झालेल्या विश्वचषकाच्या या 92 वर्षांचा कालखंडचा विचार करता या स्पर्धेवर युरोप देशांचे आणि दक्षिण अमेरिका या देशांचे वर्चस्व दिसून येते. फुटबॉल म्हटले की पेले आणि डियागो मॅराडोना यांच्याबरोबर मायकल प्लॅटिनी, फ्रँक बेकनबोर, रोनाल्डो (ब्राझील), डेव्हिड बेकहॅम, झिनेदीन झिदान ही नावे डोळ्यासमोर येतात. तर गेल्या दशकातील सर्वांच्या गळ्यातीत ताईत असलेले अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी, ब्राझीलचा नेमार आणि पोर्तुगालचा होरो क्रिस्टीयानो रोनाल्डो यांची जादुई नजाकत अनुभवायला मिळणार आहे.

या तीन दिग्गजांच्या बरोबरीने अनेक दर्जेदार खेळाडूंच्या खेळाची किमया बघण्याची नामी संधी सर्वांना मिळणार आहे. सन 1930 या स्पर्धेच्या या 92 वर्षांचा काळखंडचा विचार करता या स्पर्धेवर युरोप खंडातील आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांचे वर्चस्व दिसून येते. दक्षिण अमेरिका खंडात समावेश असलेल्या ब्राझीलने सर्वात जास्त पाच वेळा हा मानाचा विश्वचषक उंचवण्याचा मान मिळवला आहे. तरडियागो मॅराडोनाच्या अर्जेंटिनाने हा चषक दोन वेळा उंचावला आहे. युरोप देशामध्ये समावेश असलेल्या जर्मनीने सुंदर सांघिक कामगिरीच्या आधारे चारवेळा हा मान मिळवला आहे. तर मागील 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या फ्रान्सच्या संघाने दोनवेळा या चषकला गवसणी घातली आहे.

कतारमध्ये आयोजित या विश्वचषकामध्ये नावाजलेले ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगाल, नेदरलँड, फ्रान्स, स्पेन यांचा समावेश असला तरीही तीनवेळा हा मानाचा विश्वचषक उंचावणार्‍या इटली संघाला या विश्वचषकमध्ये पहिल्या 32 मध्ये स्थान मिळवता आले नाही. आशियाई देशांचा विचार करता या 23 विश्वचषकांपैकी दक्षिण कोरियाने 11 वेळा तर जपानने सात वेळा इराण आणि सौदी अरब संघाने पाच वेळा विश्वचषकामध्ये प्रवेश मिळवला आहे. तर 2002 च्या विश्वचषकाचे कोरिया आणि जपान यांनी संयुक्त आयोजन केले आहे. इतकेच नव्हे तर कोरियाने या स्पर्धेत सुंदर खेळाचे प्रदर्शन करून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या बरोबरीने मेडल्सची लयलूट करणार्‍या बलाढ्य चीनला या फुटबॉलच्या विश्वचषकामध्ये केवळ एकदाच म्हणजे 2002 च्या स्पर्धेत पहिल्या 32 मध्ये प्रवेश करण्यात यश आले आहे आणि चीनला बाद फेरी गाठण्यातही यश आले नाही. यामध्येच या फुटबॉलच्या जादूची प्रचिती येते. याआधीच्या सर्व 22 विश्वचषकाचे आयोजन हे ठरलेल्या वेळेत म्हणजे जून-जुलै या महिन्यांमध्ये केले गेले होते. परंतु या स्पर्धा कतारमध्ये होत असल्यामुळे तेथे जून-जुलैमध्ये कडक ऊन असल्यामुळे आपल्या 92 वर्षांच्या नियमांना फाटा देऊन या फिफाने या स्पर्धेला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. आपण या फुटबॉलच्या महाकुंभाचे स्वागत करून याची जादू आपल्या डोळ्यात साठवून ठेवायला सुरवात करूया.

फिफा देणार 3.6 हजार कोटींचे बक्षीस

फिफा विश्वचषकाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. यादरम्यान फिफा विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम समोर आली असून ती 3.6 हजार कोटी असणार आहे. फिफाच्या आणि टी-20 विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत किती फरक असतो हे जाणून घेऊयात. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत.

आयसीसीची बक्षीस रक्कम?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 5.6 दशलक्ष (45.14 कोटी रुपये) ची बक्षीस रक्कम निश्चित केली होती, जी सर्व 16 संघांमध्ये वेगळ्या पद्धतीने वाटली गेली. अंतिम फेरीच्या चॅम्पियन संघाला सुमारे 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला सुमारे 6.44 कोटी रुपये मिळाले.

फिफाची बक्षीस रक्कम?

फिफा वर्ल्डकपसाठी बक्षिसाची रक्कमही जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वितरीत करण्यात येणारी बक्षीस रक्कम 440 दशलक्ष (सुमारे 3 हजार 585 कोटी रुपये) निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये वर्ल्डकप जिंकणार्‍या संघाला 42 मिलियन डॉलर (सुमारे 342 कोटी रुपये) मिळतील. मागील 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com