IPL 2022 : आरसीबीला मिळाला नवा कर्णधार; आता 'या' दिग्गजाकडे संघाची कमान

IPL 2022 : आरसीबीला मिळाला नवा कर्णधार; आता 'या' दिग्गजाकडे संघाची कमान

मुंबई | Mumbai

आयपीएल १५ मध्ये (IPL 15) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघाचा सलामी सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध होणार आहे. तत्पूर्वी ९ संघांनी आपले कर्णधार निश्चित केले होते....

मात्र आरसीबीचे (RCB) कर्णधारपद कोण भूषवणार? असा प्रश्न पडलेल्या आयपीएल चाहत्यांना आता दिलासा मिळाला आहे. कारण आरसीबीने फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याची कर्णधार (Captain) म्हणून निवड केली आहे.

गतवर्षी आयपीएलच्या (IPL) बाद फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू असलेल्या डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) कर्णधारपद भूषवले असल्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.

डू प्लेसिस आरसीबीचा (RCB) सातवा कर्णधार असणार आहे. याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे, केविन पीटरसन, शेन वॉटसन, विराट कोहली आणि डॅनियल व्हिटोरी यांनी संघाचे नेतृत्व केले आहे.

तीन वेळा अंतिम सामन्यात बंगळूरला आपले स्थान मिळवता आले आहे. मात्र अद्याप विजेतेपदाची कोरी पाटी भरण्यात अपयशी ठरलेल्या बंगळूरला फाफ डू प्लेसिस पहिले विजेतेपद जिंकून देणार का? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com