WTC Final : आयसीसीने जाहीर केली बक्षीसाची रक्कम

WTC Final : आयसीसीने जाहीर केली बक्षीसाची रक्कम

साऊदम्प्टन | southampton

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आयसीसीने विजेत्या आणि उपविजेत्या संघाला दिली जाणारी बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे...

ही अंतिम लढत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये येत्या १८ जून ते २३ जून दरम्यान होणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघाने या सामन्यासाठी जय्यत तयारी केली आहे. या सामन्यात बाजी मारून मानाच्या गदेसह कोट्यावधीची रक्कम जिंकण्याची संधी दोन्ही संघांना मिळणार आहे.

विजेत्या संघाला मिळणार १. ६ मिलियन डॉलर्स

ईएसपीएन क्रिकेट इन्फोनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे, अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला आयसीसीकडून १.६ अमेरिकन मिलियन डॉलर, म्हणजेच ११ कोटी ७१ लाख ७४,०२२. ४० इतकी रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला ८ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच ५ कोटी ८५ लाख ८७,०११.२० इतकी रक्कम मिळणार आहे.

आयसीसीचे सीईओ जेफ आलारडीस यांनी ही माहिती दिली आहे. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांमध्ये समान रक्कम वाटण्यात येईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता होणार आहे.

असे आहेत बदल

  • भारतीय क्रिकेट कसोटी संघ कसोटी सामन्यांमध्ये एसजी चेंडू, तर न्यूझीलंड कुकाबुरा चेंडूचा वापर करतो. मात्र अंतिम सामन्यामध्ये ग्रेड वन ड्यूक चेंडू वापरण्यात येणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमांमध्ये शॉर्ट रन , डीआरएस, खेळाडूंची समीक्षा आदी नियमांचा समावेश असणार आहे.

  • मैदानी पंचानी शॉर्ट रन दिल्यानंतर तिसरे पंच स्वतः आढावा घेतील पुढचा चेंडू टाकण्याआधी स्वतःचा निर्णय मैदानी पंचांना कळवला जाईल.

  • पायचीतच्या अपील झाल्यानंतर डीआरएस घेण्याआधी फिल्डिंग करणाऱ्या संघाचा कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता का, याबाबत पंचांशी विचारणा करू शकेल.

  • पायचीतबाबत डीआरएस घेण्यासाठी खेळपट्टीचे क्षेत्र वाढवून ते यष्टीच्या उंचीपर्यंत करण्यात आले आहे.

सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com