'त्या' फोटोंवरील प्रतिक्रियांमुळे भडकली जपानची टेनिसपटू
क्रीडा

'त्या' फोटोंवरील प्रतिक्रियांमुळे भडकली जपानची टेनिसपटू

स्विमसुट घातलेले फोटो सोशल मीडियावर केले होते शेअर

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली - New Delhi

जपानची महिला टेनिस स्टार नाओमी ओसाका सध्या सोशल माडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. स्विमसुट फोटोबद्दल नेटकर्‍यांनी ओसाकाला चांगलेच ट्रोल केले होते. या ट्रोलिंगकरून ओसाका नाराज झाली आहे.

ओसाकाने काही दिवसांपूर्वीच, स्विमसुट घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवरून चाहत्यांनी तिला डिवचले. ओसाका, तू तुझी निर्दोष प्रतिमा टिकवून ठेवावी. जे तू नाही आहेस ते होण्याचा प्रयत्न करू नकोस, असे चाहत्यांनी तिला सांगितले.

या चर्चेला ओसाकाने उत्तर दिले. ती टिवटरवर म्हणाली, ‘या लोकांच्या प्रतिक्रियेमुळे मी अस्वस्थ होत आहे. तुम्ही मला ओळखत नाही. मी २२ वर्षांची आहे आणि तरणतलावामध्ये स्विमसूट घालते. मी काय परिधान केले यावर भाष्य करावे असे तुम्हाला का वाटते?‘

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com