Asia Cup Hockey : भारतीय संघ जपानशी भिडणार

Asia Cup Hockey : भारतीय संघ जपानशी भिडणार

मुंबई । Mumbai

आशिया चषक हॉकी स्पर्धेत (Asia Cup Hockey Tournament) विजेतेपदाचा चौकार मारण्याची संधी हुकलेली भारतीय संघ आता आपल्या अखेरच्या सामन्यात जपानविरुद्ध (Japan) कांस्यपदकासाठी (Bronze Medal) भिडणार आहे...

भारतीय संघाला (Indian Team) मंगळवारी झालेल्या दक्षिण कोरियाविरुद्धचा (South Korea) सामना ४-४ ने बरोबरीत सुटल्यांनंतर भारतीय संघाचे अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

भारताकडून संजिप यांनी ९ व्या मिनिटाला, मनिंदरने २२ व्या मिनिटाला, महेशने २२ व्या मिनिटाला आणि शक्तिवेल यांनी ३७ व्या मिनिटाला प्रत्येकी -१ गोल नोंदवला. तर भारतीय संघाला ४० वर्षात दुसऱ्यांदा कांस्यपदकासाठी (Bronze Medal) सामना खेळायचा आहे.

दरम्यान, १९९९ मध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने मलेशियावर (Malaysia) विजय नोंदवून कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे आता भारतीय हॉकी संघ जपानला पराभूत करून कांस्यपदक जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com