राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज पहिला सामना

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज पहिला सामना

अबुधाबी | Abudhabi - सलिल परांजपे (नाशिक)

आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या दुसऱ्या निर्णायक टप्प्यामध्ये आज शनिवारी डबल हेडर लढतींची मेजवानी आयपीएल क्रिकेट (IPL cricket) चाहत्यांना चाखायला मिळणार आहे. पहिला सामना अबुधाबी येथील शेख झायद मैदानावर दुपारी ३ वाजता आयपीएल उदघाटन पर्वाचे विजेते राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खात्यात १४ गुण आहेत. राजस्थान रॉयल्स संघाला नमवून आयपीएल २०२१ च्या बाद फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरण्याची संधी दिल्ली कॅपिटल्स संघाकडे चालून आली आहे. तिचा फायदा घेण्यासाठी दिल्ली सज्ज संघ सज्ज झाला आहे.

दुसऱ्या हाफमधील आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०१६ च्या विजेत्या सनराईझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाला २० षटकात १३५ धावत रोखले होते. या सामन्यात कांगिसो रबाडा एन्रिक नोकिया (Kangiso Rabada Enrique Nokia) आणि आवेश खान यांनी केलेल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे आणि त्यांना इतर गोलंदाजांनी दिलेल्या सुरेख साथीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला ही उल्लेखनीय कामगिरी करता आली होती.

हा सामना दिल्लीनं ८ विकेट्स राखून जिंकला होता. या सामन्यात दिल्ली संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि नुकताच दुखापतीतून सावरून दिल्ली संघात पुनरागमन केलेला दिल्ली संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे (Excellent batting) दिल्लीला विजय साकारून दिला होता.

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघानं पंजाब किंग्जविरुद्ध अखेरच्या षटकात २ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाने राजस्थान संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता आयपीएल २०२१ मध्ये तुफान फॉर्मात असलेल्या दिल्लीला रोखण्यात राजस्थान रॉयल्स यशस्वी होणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पंजाबकिंग्ज (Punjabkings) विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचे डावखुरे सलामीवीर इविन लुईस (Evin Lewis) आणि यशस्वी जयस्वाल (Yashswi Jaiswal) आणि संघाला आकर्षक सुरुवात करून देऊन आपल्या संघाच्या विजयाचा पाया मजबूत केला होता. त्यांना लियम लिंगविस्टन (Liam Lingviston) महिपाल लोमरोर यांनी सुरेख साथ दिल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघानं २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या होत्या.

मात्र संघासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार संजू सॅमसन क्रिस मॉरीस (Sanju Samson Chris Morris) आणि युवा अष्टपैलू राहुल टेवटिया (Rahul Tewatia) अपयशी ठरले होते. त्यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede ground) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज आहे.

दिल्ली संघाच्या फलंदाजीची मदार शिख्रर धवन,अजिंक्य राहणे, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मीथ, श्रेयस अय्यर, शिमररोन हेटमायर आहेत. अष्टपैलूंमध्ये मार्कस स्ट्रोइनीस, आर अश्विन, अक्षर पटेल, टॉम करण ललित यादव आहेत. गोलंदाजीत ईशांत शर्मा, आवेश खान, रबाडा, प्रवीण दुबे, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, रिपाल पटेल बेन डॉरशियास, एल मेरीवाला, अमित मिश्रा आहेत .

दिल्ली संघाच्या फलंदाजीची मदार शिख्रर धवन,अजिंक्य राहणे, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मीथ, श्रेयस अय्यर, शिमररोन हेटमायर आहेत.अष्टपैलूंमध्ये मार्कस स्ट्रोइनीस, आर अश्विन, अक्षर पटेल, टॉम करण ललित यादव आहेत. गोलंदाजीत ईशांत शर्मा, आवेश खान, रबाडा, प्रवीण दुबे, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, रिपाल पटेल बेन डॉरशियास, एल मेरीवाला, अमित मिश्रा आहेत

राजस्थान संघाच्या फलंदाजीची मदार संजू सॅमसन, इविन लुईस, महिपाल लोमरोर, रियन पराग, लियम लिंगविस्टन, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत आहेत. अष्टपैलूंमध्ये क्रिस मॉरीस, राहुल टेवटिया, श्रेयस गोपाल, शिवम दुबे आहेत. गोलंदाजीत जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, आकाशसिंग, मुस्तफिजूर रहेमान, केसी करिअप्पा, कुलदीप यादव, मयंक मार्कंडे आहेत.

Related Stories

No stories found.