IPL 2022 : बंगळूरचा नवा कर्णधार कोण?; उद्या होणार फैसला

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

आयपीएल १५ ची (IPL 15) सुरुवात येत्या २६ मार्चपासून होणार आहे. यंदाच्या हंगामात लखनौ सुपरजायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स (gujarat titans) या दोन नवीन संघांना नव्याने प्रवेश मिळवला आहे....

त्यामुळे हा हंगाम अतिशय रोमहर्षक होणार आहे. दोन नवीन संघ स्पर्धेत दाखल झाल्यामुळे सर्वच संघ पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार आहेत. ९ संघांनी आपला कर्णधार निश्चित केला आहे.

पण आयपीएल २०२१ मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात बाद फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे विराट कोहलीने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा देऊन आरसीबी (RCB) संघांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे आयपीएल १५ मध्ये आरसीबी संघाचं नेतृत्व कोण भूषवणार? असा प्रश्न निर्माण झालेल्या आरसीबी समर्थकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

२७ मार्च रोजी आरसीबी संघाचा सलामी सामना पंजाबकिंग्ज संघाशी होणार आहे. तत्पूर्वी त्यांना आपला कर्णधार निश्चित करणे गरजेचे आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (royal challengers bangalore) संघाची एक पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार आहेत.

सध्या बंगळूर संघाकडे ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली हे चार पर्याय आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचे कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील माजी अनुभवी फलंदाज आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून अनेक महत्वपूर्ण सामन्यांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारा फाफ डू प्लेसिसकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com