IPL 2020 मधून Vivo आऊट
क्रीडा

IPL 2020 मधून Vivo आऊट

Vivo आणि बीसीसीआयमध्ये हा करार 5 वर्षासाठी झाला होता

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

भारत चीन वादाचा फटका चीनची मोबाईल उत्पादक कंपनीत विवो Vivo ला देखील बसला आहे. बीसीसीआयने Vivo सोबत असलेला मुख्य प्रायोजकचा करार रद्द केला आहे.

Vivo आणि बीसीसीआयमध्ये हा करार 5 वर्षासाठी झाला होता. पण तो दोन वर्षातच रद्द करण्यात आला. बीसीसीआयने देखील दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने मेल करून याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने मेल मध्ये म्हंटले आहे की, " भारतीय क्रिकेट बोर्ड आणि विवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सोबत मिळून 2020 च्या इंडियन प्रीमियर लीग साठी दोघांमधील करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे."

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com