सहकुटुंब दौऱ्यावर जाण्यास विरोध; वॉर्न, पीटरसनचा संताप

सहकुटुंब दौऱ्यावर जाण्यास विरोध; वॉर्न, पीटरसनचा संताप

लंडन | london

कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे तब्बल चार महिने होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर खेळाडूंना आपल्या परिवाराला घेऊन जाता येणार नाही. येत्या डिसेंबरमध्ये होणारी ऍशेस कसोटी मालिका रद्द करण्यात यावी, असे इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉर्न याने सांगितले आहे...

ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाच्या सर्व खेळाडूंना आपल्या परिवाराशिवाय दौऱ्यावर जावे लागण्याची शक्यता आहे. ८ डिसेंबरपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

यावर मायकेल वॉर्नने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, इंग्लंड संघातील सर्व क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या परिवाराला सोबत नेता येणार नसल्याच्या बातम्या ऐकण्यास मिळत आहेत. असे झाले तर सलग चार महिने आपल्या परिवारासोबत राहता येणार नाही हे आम्ही कधीच मान्य करणार नाही.

इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज केविन पीटरसन यानेही याबाबत दुजोरा दिला आहे. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंनी संपूर्ण कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला. तर त्यांना दोषी ठरवू नये असे पीटरसन याने म्हटले आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जर कोणत्याही खेळाडूने संपूर्ण मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. असेही तो म्हणाला.

कुटूंब हे खेळाडूसाठी आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. कोरोना काळात सर्व खेळाडूंना आपल्या कुटुंबाची साथ महत्वाची आहे. या मालिकेला अजून बराच अवधी शिल्लक आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यावर निश्चितच मार्ग काढता येऊ शकेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. इंग्लंडचे सर्व खेळाडू बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यावर आपल्या कुटुंबाशिवाय जाणार आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com