टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम

टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम

मुंबई | Mumbai

आयसीसीने कसोटी क्रिकेट संघांची क्रमवारी काल गुरुवारी जाहीर केली. या जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारतीय संघाच्या खात्यात १२२ गुण असून, भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांच्याखालोखाल १२० गुणांसह न्यूझीलंड १२० गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघाच्या खात्यामध्ये २४ सामन्यांमध्ये २९१४ गुण जमा आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने १८ कसोटी सामन्यांमध्ये २ रेटिंग गुणांसह २१६६ गुण जमा आहेत. गतवर्षी झालेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २-१ तर इंग्लंडला मायदेशात ३-१ असा पराभव केला होता. तर न्यूझीलंडने पाकिस्तान आणि विंडीजवर आपल्या अखेरच्या दोन कसोटी मालिकांमध्ये २-० असा मालिकाविजय साकारला होता.

मे २०२० पासून झालेल्या सर्व सामन्यांसाठी एकूण १०० गुण तर तर दोन वर्षांआधी झालेल्या सामन्यांसाठी ५०% गुण देण्यात आले आहेत.

इंग्लंड १०९ गुणांसह तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान ९४ गुणांसह पाचव्या तर विंडीजसहाव्या दक्षीण आफ्रिका सातव्या श्रीलंका आठव्या स्थानावर आहे . मात्र बांगलादेश संघाची कामगिरी मागील वर्षभरापासून निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्यांना एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बांगलादेश नवव्या तर झिम्बाब्वे दहाव्या स्थानावर आहे.

-सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com