राहुलने धु-धु धुतले; टीम इंडियाचा स्कॉटलंडवर मोठा विजय

राहुलने धु-धु धुतले; टीम इंडियाचा स्कॉटलंडवर मोठा विजय

दुबई | Dubai

टी20 विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा (Scotland) आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये (T20 World Cup Semifinal) पोहचण्याची आशा अजूनही जिवंत ठेवली आहे....

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 33 वा वाढदिवस साजरा करणार आहे. विराटला (Virat Kohli) टीम इंडियाने (Team India) मोठा विजय संपादन करून विजयाचे गिफ्ट दिले आहे.

स्कॉटलंडने भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं लक्ष ठेवले होते. भारताला उपान्त्य फेरी गाठण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. हेच लक्ष्य समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुलने (KL Rahul) पहिल्या षटकापासूनच धडाकेबाज फलंदाजी केली.

या जोडीने पहिल्या विकेटसाठी 5 षटकात 70 धावांची पार्टनरशिप केली. रोहित शर्मा 30 धावांवर बाद झाला त्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 30 धावा केल्या. तर केएल राहुल 50 धावांवर बाद झाला. अवघ्या 19 चेंडूत राहुलने 3 षटकार आणि 6 चौकार मारत वेगवान अर्धशतक ठोकलं

यानंतर विराट कोहली आणि सुर्याकुमारने 7व्या षटकात भारताचा विजय साकारला . सुर्यकुमारने षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावातच गारद झाला.

सामन्याच्या तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने विकेट घेत स्कॉटलंडला पहिला दणका दिला. यानंतर एका मागून एक खेळाडू माघारी निघू लागला होता. अखेरीस अवघ्या ८५ धावांत स्कॉटलंडचा संघ ढेपाळला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com