
मुंबई । Mumbai
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India & South Africa) यांच्यातील ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना आज गुरुवारी ९ जून २०२२ रोजी नवी दिल्लीच्या (New Delhi) अरुण जेटली क्रिकेट मैदानावर (Arun Jaitley stadium) होणार आहे...
आज होणाऱ्या मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा बदली कर्णधार आणि आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दुखापतग्रस्त झाल्यामुळे या मालिकेत खेळू शकणार नाहीत.
तसेच भारतीय संघनिवड समितीने अद्याप बदली खेळाडूंची घोषणा केलेली नसून संघाचे कर्णधारपद रिषभ पंतकडे (Rishabh Pant) असणार आहे. तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपकर्णधार असणार आहे.
भारतीय टी २० संघ असा
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर,अक्षर पटेल, युझवेन्द्र चहल, हर्षल पटेल,रवी बिष्णोई,भुवनेश्वर कुमार,आवेश खान, आर्षदिपसिंग, उमरान मलिक
सलिल परांजपे, नाशिक