
मुंबई । Mumbai
आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार पाकिस्तान संघाने (Pakistan team) भारताला मागे टाकत चौथे स्थान पटकावले.तर न्यूझीलंड संघाने (New Zealand team) आपले अव्वल स्थान कायम राखले आहे...
पाकिस्तान (Pakistan) संघाने नुकत्याच पार पडलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (ODI series) ३-० असे यश संपादन केल्याने चौथ्या स्थानी झेप घेतली. तसेच पाकिस्तान चौथ्या स्थानी आल्यामुळे भारताची (team india) पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI rankings) भारताला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला विंडीजविरुद्ध (West Indies team) ३ सामने जिंकणे अनिवार्य होते.
दरम्यान, भारताला पुढील महिनाभराच्या कालावधीत इंग्लंड (England) आणि विंडीजविरुद्ध प्रत्येकी (West Indies) ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांमध्ये भारताने पाकिस्तानला मागे टाकून मालिका विजय मिळवल्यास पुन्हा चौथे स्थान गाठण्याची संधी (Opportunity) असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक