भारताचे दोन्ही संघ क्वारंटाईन; मुंबईत आठ दिवस राहणार वेगळे

भारताचे दोन्ही संघ क्वारंटाईन; मुंबईत आठ दिवस राहणार वेगळे

नाशिक | प्रतिनिधी

भारतीय पुरुष आणि महिला संघ आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघ सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन दोन्ही संघाना मुंबईत कडक जैव सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे....

दोन्ही संघांमधील सर्व खेळाडू पुढील आठ दिवस एकांतात राहणार आहेत त्यानंतर त्यांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या संपूर्ण स्टाफची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीतील तीन अहवाल नकारात्मक आढळून आल्यास दोन्ही संघाना इंग्लंडला रवाना होता येणार आहे.

भारतीय पुरुष संघाला १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध ३ एकदिवसीय ३ टी २० आणि १ कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेला १६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. खेळाडूंच्या संपूर्ण कुटुंबाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

सलिल परांजपे नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com