ICC Women's World Cup : 'नो बॉल'मुळे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे

ICC Women's World Cup : 'नो बॉल'मुळे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे

न्यूझीलंड | New Zealand

आयसीसी वुमन्स वर्ल्डकपमधून (ICC Women's World Cup) टीम इंडिया (Team India) बाहेर पडली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने (South Africa) टीम इंडियाचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे वेस्ट इंडिजचे सेमीफायनलमधील स्थान पक्के झाले आहे...

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ७ बाद २७४ धावा केल्या. शेवटच्या २ बॉल्समध्ये दक्षिण आफ्रिकेला तीन धावा हव्या होत्या.

मात्र यावेळी दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नो बॉल (No Ball) फेकला आणि दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) विजय जवळपास निश्चित झाला. अखेरच्या २ बॉल्समध्ये विरोधी टीमने २ धावा काढून भारताचा पराभव केला.

दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्टने ८० धावा केल्या. याशिवाय लारा डूडलने ४९ धावा केल्या. मिनोआन डू प्रेझने उत्तम खेळी करत ५० धावा केल्या. दुसरीकडे भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक २ गडी बाद केले. तिने १० षटकात ६१ धावा दिल्या. हरमनप्रीत कौरने ८ ओव्हर्समध्ये २ गडी बाद केले.

टीम इंडिया बाहेर पडल्याने महिला वर्ल्डकपच्या उपांत्य फेरी कोणत्या टीममध्ये खेळली जाईल हे निश्चित झाले आहे. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com