टी २० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया आज होणार जाहीर

टी २० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया आज होणार जाहीर

मुंबई | Mumbai

येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये यूएईत (UAE) टी २० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आज बुधवारी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात येणार आहे. येत्या काही तासांमध्ये संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे....

आज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohali Caption Team India) उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Voice Caption Team India) आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shatsri coach team India) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठकीला हजर राहणार आहेत. भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार असा प्रश्न सध्या प्रत्येक भारतीय समर्थकाच्या मनात निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला भारतीय क्रिकेट संघाची निवड करणं कठीण असणार आहे. आयपीएल २०२० चा हंगाम यूएईत पार पडला होता. या हंगामात अनेक खेळाडूंची कामगिरी उल्ल्लेखनीय ठरली होती. पृथ्वी शॉ , ईशान किशन , संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या चौघांपैकी दोघांचा समावेश भारतीय संघात केला जाऊ शकतो.

भारतीय क्रिकेट कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मुंबईकर शार्दूल ठाकूर यानं ओव्हल कसोटी सामन्यात दोंन्ही डावात अर्धशतक झळकावून आपल्या गोलंदाजीतूनही चमकदार कामगिरी करून भारताच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले होते.

त्यामुळे अंतिम १५ जणांमध्ये त्याच्या नावावर विचार केला जाण्याची शक्यता आहे. तेज गोलंदाजीत दीपक चाहर ,जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार किंवा मोहंमद शमीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर फिरकीपटूनमध्ये राहुल चाहर , वरुण चक्रवर्ती युझवेन्द्र चहल यांना संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

सलील परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com