
नवी दिल्ली | New Delhi
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आज शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे असणार आहे...
पाचव्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) करोना अहवाल २ वेळा सकारात्मक आला होता. त्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे.
बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड विरुद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद नियमित कर्णधार रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे.
पहिल्या टी २० साठी भारतीय संघ
रोहित शर्मा, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेन्द्र चहल, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आर्षदिपसिंग, आवेश खान, उमरान मलिक.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी २० साठी भारतीय संघ
रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, रवी बिष्णोई, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि उमरान मलिक.
एकदिवसीय संघ
रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युझवेन्द्र चहल, अक्षर पटेल, मोहंमद शमी, आर्षदिपसिंग, प्रसिध कृष्णा.
सलिल परांजपे, नाशिक.