T20 World Cup : आज भारत विरुद्ध नेदरलँड सामना, पाऊस बनणार खलनायक?

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार? भारतीय संघ बाहेर जाणार की उपांत्य फेरी गाठणार?
T20 World Cup : आज भारत विरुद्ध नेदरलँड सामना, पाऊस बनणार खलनायक?

मुंबई | Mumbai

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर तुलनेने कमकुवत असलेल्या नेदरलँड्सविरूद्ध गुरुवारी भारतीय संघ दुसरा सामना खेळणार आहे.

दरम्यान या सामन्यावेळी पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय आल्यास सामन्याच्या ओव्हर्स कमी केल्या जाऊ शकतात, तसंच अधिक पाऊस असल्यास सामना रद्दही केला जाऊ शकतो. त्यात बुधवारी झालेल्या आयर्लंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार रिझल्ट काढला गेला, तसंस करण्याची शक्यता देखील आहे.

जर भारत-नेदरलँड सामना रद्द झाला तर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या शक्यतांवर परिणाम होईल का? तर उत्तर असे आहे की, हा सामना रद्द झाल्यानंतरही भारत उपांत्य फेरीत सहज पोहोचू शकतो कारण भारताकडे आधीच तीन गुण असतील.

पण अशा स्थितीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने जिंकावे लागतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही गडबड झालीच तर बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवूनही भारत सात गुणांवर पोहोचेल. मग त्यांच्यासाठी नेट-रन रेटचाही मुद्दा असू शकतो.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

नेदरलँड्स संघ :

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, विक्रम सिंग, शरीझ अहमद, टॉम कूपर, बास डी लीड, ब्रँडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगेन, रुलोफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकेरेन.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com