ठरलं ! टी २० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून

आयसीसीची मोठी घोषणा
ठरलं ! टी २० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून

मुंबई । Mumbai

बीसीसीआयने (BCCI) सोमवारी २८ जून रोजी झालेल्या आपल्या महत्वपूर्ण बैठकीत (BCCI Meeting) टी २० वर्ल्डकप यूएईत (T20 WC In UAE) खेळवण्यात येईल असे स्पष्ट केले होते. ही स्पर्धा येत्या १७ ऑक्टोबर पासून सुरु होईल आणी अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल असे बीसीसीसीआयने आपल्या बैठकीत जाहीर केले होते. पण काल बुधवारी आयसीसीने वर्ल्डकप यूएईत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयसीसीने या स्पर्धेचं यजमानपद बीसीसीआयकडे राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सर्व सामने दुबई , ओमान , अबुधाबी , आणि शारजा या मैदानांवर रंगणार आहेत. असेही स्पष्ट केले आहे स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ संघांची (Eight Teams) विभागणी दोन गटांमध्ये करण्यात येणार आहे.

टी वर्ल्डकप पाच वर्षांनंतर होणार आहे. आयसीसी वर्ल्डकपचं आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येतं पण मात्र यंदा ही स्पर्धा पाच वर्षांनी खेळवण्यात येणार आहे. २०२० रोजी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) खेळवण्यात येणार होती.

पण कोरोना महामारीच्या (Corona Crisis) महाभयंकर संकटामुळे ही स्पर्धा रद्द (Compatitaon Postponed) करण्यात आली होती. २०२१ चा हंगाम भारतात आयोजित करण्यात येणार होता. पण कोरोना रुग्णसंख्येत होणारी दैनंदिन वाढ लक्षात घेऊन बीसीसीआयनं यंदाची संपूर्ण स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

पात्रता फेरीतील विभागलेले संघ

गट अ श्रीलंका , आयर्लंड , ओमान , पापुआ न्यू गिनी.

गट ब बांगलादेश , हॉलंड , नामिबिया , स्कॉटलंड.

मुख्य फेरी

गट अ ऑस्ट्रेलिया, विंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान, पहिल्या फेरीतील अ गटातील पहिला संघ, पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातील दुसरा संघ.

गट ब इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान पहिल्या फेरीतील ब गटातील पहिला संघ, पहिल्या फेरीतील अ गटातील पहिला संघ.

सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com