T20 World Cup 2022 चे 'असे' होतील सामने

T20 World Cup 2022 चे 'असे' होतील सामने

मुंबई | Mumbai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये (ICC T20 World Cup 2021) न्यूझीलंड संघावर (New Zealand) मात करून आपले पहिले विजेतेपद मिळवणाऱ्या डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलिया (Australia) पुढील वर्षी २०२२ मध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या टी २० वर्ल्डकपचे (T20 World Cup) यजमानपद भूषवणार आहे...

आयसीसीने (ICC) या विश्वचषकाचा (World Cup) कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. स्पर्धेत एकूण ४५ सामन्यांचा थरार क्रिकेट (Cricket) चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेचे हे आठवे पर्व असणार आहे. हे सर्व सामने ब्रिस्बेन, ऍडिलेड, जिलोंग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ, सिडनी येथे होणार आहेत. उपांत्य सामने ९ नोंव्हेंबर आणि १० नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश हे आठ संघ सुपर १२ लढतींसाठी थेट पात्र ठरले आहेत. आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा २ वेळचा विजेता विंडीज, २०१४ सालाचा विजेता श्रीलंका पात्रता फेरी खेळून मुख्य फेरीत दाखल होणार आहेत. मुख्य फेरीला सुरुवात होण्यापूर्वी पात्रता सामने होणार आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com