IND vs PAK : राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्माला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं? पहा Video

IND vs PAK : राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्माला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं? पहा Video

दिल्ली | Delhi

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामन्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघ सुपर-12 टप्प्यात आमने-सामने आले आहेत.

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. ज्यावेळी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताचं राष्ट्रगीत (Indian Anthem) वाजलं, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रोहित कसेतरी आपल्या भावनांवर आवर घालताना दिसला. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाला मागच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता आणि त्यात पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती. यंदा सर्व काही सुरळीत वाटत असताना रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

आशिया चषक 2022 स्पर्धेत उभय संघ दोनवेळा समोरासमोर आले आणि 1-1 अशी बरोबरी राहिली. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. पण, अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी खूप मार खाल्ला आणि रोहितसाठी ती चिंतेची बात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com