T20 World Cup 2021 : आज दक्षिण आफ्रिका-बांगलादेश, पाकिस्तान-नामिबिया लढत

T20 World Cup 2021 : आज दक्षिण आफ्रिका-बांगलादेश, पाकिस्तान-नामिबिया लढत

अबू धाबी | Abu Dhabi

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ (ICC T20 World Cup 2021) सुपर १२ मध्ये आज मंगळवारी पहिला सामना दक्षिण आफ्रिका (south africa) आणि बांगलादेश (Bangladesh) संघांमध्ये अबूधाबीच्या शेख झाएद मैदानावर खेळवण्यात येणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण ३:३० वाजता स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतून आपले सुरुवातीचे तिन्ही सामने गमावल्यामुळे बांगलादेश विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्यामुळे आपले उर्वरीत दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपमध्ये विजयी शेवट करण्याच्या निमित्ताने बांगलादेश आज मैदानात उतरणार आहे.

मात्र बांगलादेश संघाचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे बांगलादेश संघ दक्षिण आफ्रिकेपुढे काहीसा दुबळा दिसत आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सलामी सामन्यात अनपेक्षित पराभव पत्कारल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका (Sri lanka) आणि विंडीज (West Indies) संघाना पराभवाची धूळ चारून विजयी लय परत मिळवली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज आहे.

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघांमध्ये आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेने ६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर टी २० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत.

तसेच दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघांमध्ये २०१७ मध्ये झालेल्या अखेरच्या टी २० सामन्यात डेविड मिलरने ३६ चेंडूंमध्ये शानदार शतक ठोकून बांगलादेश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. मिलरला लवकर बाद करण्यात बांगलादेश कितपत यशस्वी ठरणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाकिस्तान विजयी चौकारासाठी सज्ज

अबू धाबी | आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये आजच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) आणि नामिबिया (Namibia) संघांमध्ये अबूधाबीच्या मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता सामना होणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये सलग ३ विजयामुळे कमालीचा लयीत असलेला पाकिस्तान नामिबिया संघावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे.

आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करण्याच्या इराद्याने पाकिस्तान नामिबियाचा सामना करणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) स्वीकरलेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी नामिबिया सज्ज आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात नामिबियाने पाकला नमवल्यास भारत (India) आणि न्यूझीलंडचा (new zealand) प्रवास अधिक खडतर होणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com