
दिल्ली | Delhi
T20 World Cup मध्ये आज हाय वोल्टेज सामना पहायला मिळणार आहे. आज भारत विरुध्द पाकिस्तान ही लढत रंगणार आहे. यंदाचा T20 World Cup जिंकून पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे.
T20 World Cup तील हा हाय वोल्टेज सामना सामना आज (२४ ऑक्टोबर) दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
हा हाय-वोल्टेज सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स ३) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत :
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
पाकिस्तान :
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रउफ
दरम्यान T20 World Cup स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा सामना अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कोणत्याही टुनॉमेंटमध्ये आकर्षकचा केंद्र ठरत असतो. कारण दोन्ही देशांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळते. ICC टुनॉमेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघ जेव्हा आमने-सामने येत असतात, तेव्हा प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह असतो.
आतापर्यंत झालेल्या एकदिवशीय सामने आणि T20 World Cup चा इतिहास पाहिला, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये १२ सामने झाले आहेत. या सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सामन्यांच्या नाणेफेकीमध्ये भारताने ८ वेळा नाणेफेक जिंकली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याविषयी सगळीकडेच अनावश्यक चर्चा रंगते. परंतु आम्ही मात्र याकडे लक्ष न देण्यालाच प्राधान्य देतो. अमिरातीतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन आम्ही संघनिवड केली असून प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमिकेबाबत पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या स्पर्धेत नक्कीच दमदार कामगिरी करू, याची मला खात्री आहे.
विराट कोहली, (कर्णधार, भारत)
इतिहासाची उजळणी करण्यात आम्हाला मुळीच रस नाही. आम्ही विश्वविजेतेपदाच्या निर्धाराने येथे दाखल झालो असून भारताविरुद्धची लढत आमच्यासाठी अन्य सामन्याप्रमाणेच आहे. यंदा सर्व खेळाडू भारताला नमवण्याबाबत आशावादी असून आमच्या मैदानातील कामगिरीद्वारेच आम्ही ते दाखवून देऊ!
बाबर आझम (कर्णधार, पाकिस्तान)