IND vs PAK : 'हाय व्होल्टेज' सामन्यापूर्वी नेटिझन्स जोरात; सोशल मिडीयावर तुफान मीम्स व्हायरल!

IND vs PAK : 'हाय व्होल्टेज' सामन्यापूर्वी नेटिझन्स जोरात; सोशल मिडीयावर तुफान मीम्स व्हायरल!

दिल्ली | Delhi

आज टी २० क्रिकेट विश्वचषक २०२१ मध्ये भारत (India), पाकिस्तान (Pakistan) या प्रतिस्पर्ध्यांमध्ये 'हाय व्होल्टेज' सामना ('High voltage' match) रंगणार आहे. हा सामना दुबईमध्ये खेळविला जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत.

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा सामना अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कोणत्याही टुनॉमेंटमध्ये आकर्षकचा केंद्र ठरत असतो. कारण दोन्ही देशांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळते. ICC टुनॉमेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघ जेव्हा आमने-सामने येत असतात, तेव्हा प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह असतो. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधल्या सामन्याचीच जास्त उत्सुकता जगभरातल्या क्रिकेटप्रेमींमध्ये दिसून येत आहे. इंटरनेटवर तर क्रिकेट चाहत्यांच्या क्रिएटिव्हिटीला ऊत आला असून त्यासंदर्भात तुफान मीम्स आता व्हायरल होऊ लागले आहेत.

हा हाय वोल्टेज सामना सामना आज (२४ ऑक्टोबर) दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

हा हाय-वोल्टेज सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स ३) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com