T20 World Cup 2021 : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आज आमने सामने

T20 World Cup 2021 : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आज आमने सामने

शारजाह | Sharjah

आयसीसी टी ३० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत (ICC T20 World Cup 2021) आज दुसरा सामना सायंकाळी ७:३० वाजता इंग्लंड (England) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघांमध्ये होणार आहे...

हा सामना दक्षिण आफ्रिका संघाच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडला मोठ्या फरकाने हरवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज आहे. सुपर १२ लढतींमध्ये सलामी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार पत्कारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपला खेळ कमालीचा उंचावला आहे.

विंडीज, श्रीलंका, बांगलादेश संघाला नामावल्यामुळे इंग्लडला पराभूत करून विजयी चौकार मारण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज आहे. तर दुसरीकडे सलामीचे ४ सामने जिंकल्यामुळे कमालीचा लयीत असलेला इंग्लंड आपला पाचवा विजय नोंदवून उपांत्य सामन्यात आत्मविश्वासाने दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

शिवाय पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया हरल्यास आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विजयी झाल्यास दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ६ गुणांमध्ये टाय झाल्यास ज्या संघाची धावगती अधिक सरस आहे तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघ प्रचंड लयीत आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होईल यात काही शंका नाही.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com