T20 World Cup 2021 : ऑस्ट्रेलियाचे गणित विंडीज बिघडवणार?

T20 World Cup 2021 : ऑस्ट्रेलियाचे गणित विंडीज बिघडवणार?

अबू धाबी | Abu Dhabi

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत (ICC T20 World Cup 2021) आज पहिला सामना विंडीज (West Indies) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमध्ये रंगणार आहे...

या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला विजय आवश्यक असणार आहे.

नुकत्याच विंडीजमध्ये पार पडून गेलेल्या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत विंडीजने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरेल.

तर दुसरीकडे अखेरच्या सामन्यात विंडीजचे सर्व खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावून खेळ करतील यात काही शंका नाही. अष्टपैलू डीजे ब्रावो आपला अखेरचा टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

त्याला विजयी निरोप देण्यासाठी विंडीज सज्ज आहे. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पराभवाने विंडीज बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. सामना ३:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com