T20 World Cup 2021 : अफगाणिस्तान, नामिबिया आज आमने सामने

T20 World Cup 2021 : अफगाणिस्तान, नामिबिया आज आमने सामने
Afghanistan vs NamibiaAfghanistan vs Namibia

अबू धाबी | Abu Dhabi

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये (ICC T20 World Cup 2021) आज रविवारी अबूधाबीच्या शेख झाएद मैदानावर अफगाणिस्तान (Afghanistan) आणि नामिबिया (Namibia) या संघांमध्ये दुपारी ३:३० वाजता लढत होणार आहे...

नामिबिया संघाने आपल्या सलामी सामन्यात स्कॉटलंड संघावर संघर्षपूर्ण विजय मिळवून थरारक विजयाची नोंद करून आपले खाते उघडून यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शानदार सुरुवात केली आहे. आता अफगाणिस्तान संघावर विजय मिळवून आपली विजयी लय कायम ठेवण्याचा नामिबिया संघाचा मानस असणार आहे.

तर दुसरीकडे अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडवर शारजाह येथे झालेल्या सलामी सामन्यात १३० धावांनी विजय मिळवून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र आपल्या दुसऱ्या दुबई येथे झालेल्या सामन्यात फॉर्मात असलेल्या पाकिस्तान संघाने अफगाण संघावर संघर्षपूर्ण विजय मिळवून अफगाणिस्तान संघाचा विजयीरथ रोखला होता.

आता हा पराभव मागे विसरून नव्याने मैदानात उतरण्यासाठी अफगाणी संघ सज्ज आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तान आणि नामिबिया प्रथमच टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी सज्ज झाले आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com