सुरेश रैना
सुरेश रैना
क्रीडा

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

2018 मध्ये खेळला होता अखेरचा एकदिवसीय सामना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्तीची घोषणा केली आहे. 2018 मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2015 मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला.

Suresh Raina announces retirement from international cricket

रैनानं आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 36 विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं आतापर्यंत 18 कसोटी सामन्यांमध्ये 768 धावा आणि 13 विकेट्स आणि टी-20 सामन्यांमध्ये 1,605 धावा केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com