IPL 2022 : राजस्थान रॉयल्स समोर हैद्राबादचे आव्हान

IPL 2022 : राजस्थान रॉयल्स समोर हैद्राबादचे आव्हान

पुणे | Pune

म्याचविनर खेळाडूंचा भरणा असलेला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आज पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमवर (MCA Cricket Stadium Pune) सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाशी दोन हात करून विजयी सलामी देण्यासाठी मैदानात उतरणार आहे....

गत हंगामात स्पर्धेतील सुमार कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांना आयपीएल (IPL) गुणतालिकेत तळाला समाधान मानावे लागले होते. आता आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) मागील सत्रातील निराशाजनक कामगिरी मागे सारून पुन्हा नव्या उमेदीने यंदाच्या हंगामाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैद्राबाद (SRH) संघाची तुलना करायची झाल्यास राजस्थान रॉयल्स अधिक संतुलित दिसत आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या डावाची सुरुवात करण्याची जवाबदारी इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर असेल. यासाठी देवदत्त पडिकल हा पर्याय संघाकडे उपलब्ध आहे.

मधल्या फळीची जवाबदारी कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, रियन पराग यांच्यावर आहे. तर गोलंदाजीमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडे रविचंद्रन अश्विन, युझवेन्द्र चहल, प्रसीद्ध कृष्णा, नवदीप सैनी आणि ट्रेंट बोल्ट हे पर्याय आहेत. ट्रेंट बोल्टच्या समावेशाने राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाजीतही प्रचंड धार आली आहे.

हैद्राबाद संघाबद्दल (Sunrisers Hyderabad) बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्स आणि विंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरण यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे.

याशिवाय एडन मार्क्रम, राहुल त्रिपाठी, केन विलियम्सन, प्रियम गर्ग हे फलंदाज हैद्राबाद संघाचा फलंदाजीचा आधारस्तंभ आहेत. अष्टपैलूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, अभिषेक शर्मा आहेत. गोलंदाजीत टी नटराजन, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन अशी गोलंदाजी हैद्राबाद संघाकडे आहे. सामन्याला सायंकाळी ७:३० वाजेपासून सुरुवात होणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com