आयपीएल लीग स्टेजमधील अखेरचा सामना; हैद्राबाद-पंजाबमध्ये आज लढत

आयपीएल लीग स्टेजमधील अखेरचा सामना; हैद्राबाद-पंजाबमध्ये आज लढत
आयपीएल

मुंबई | Mumbai

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज रविवारी अखेरचा साखळी सामना सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे....

बाद फेरीच्या शर्यतीतून दोन्ही संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना एक औपचारिकता असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आयपीएल १५ हंगामाची विजयी सांगता करण्याचा दोन्ही संघांचा मानस आहे.

शिवाय सनरायझर्स हैद्राबाद संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सन वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. आजच्या सामन्यात हैद्राबाद संघाची कमान निकोलस पुरण किंवा भुवनेश्वर कुमारकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सुमार खेळीमुळे दोन्ही संघाना बाद फेरीतील आपलं स्थान गाठण्यात अपयश आलं आहे.

मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघाने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयासाठी हैद्राबाद संघाचं विजयासाठी पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील निकालावर फारसा फरक पडणार नसून, विजेत्या संघाला गुणतालिकेत प्रगती साधण्याची संधी आहे

१३ सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या खात्यात १२ गुण आहेत. पण सरस धावगतीच्या बळावर पंजाबकिंग्ज सातव्या तर हैद्राबाद आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये १९ सामने झाले आहेत यात हैद्राबाद संघाने १३ तर पंजाबने ६ सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे.

आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पुरण, कगिसो रबाडा, लियम लिंगविस्टन, शिखर धवन हे स्टार प्लेअर्स असतील.

आयपीएल बाद फेरी २०२२ सामन्यांविषयी...

आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील साखळी फेरीतील सामन्यांची आज रविवारी २२ मे २०२२ रोजी हैद्राबाद (SRH) आणि पंजाब किंग्ज (PBKS) सामन्याने सांगता होणार आहे. जवळजवळ ६० दिवस चाललेल्या आयपीएल २०२२ च्या अव्वल ४ स्थानांमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी १० संघांमध्ये कायमच आपल्याला कमालीची चढाओढ पाहायला मिळाली आहे.

त्यामुळे आयपीएल २०२२ च्या बाद फेरीत अव्वल ४ संघांमध्ये आपल्या संघाला स्थान मिळावे यासाठी सर्व आयपीएल चाहत्यांमध्ये कमालीचे युद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळाले. अव्वल ४ संघांमध्ये टॉप ४ संघ कोणते? यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

आयपीएल बाद फेरीचं समीकरण

  • पहिला सामना क्वालिफायर १ राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स स्थळ ईडन गार्डन कोलकाता २४ मे.

  • दोन्ही संघांनी अव्वल २ स्थानांमध्ये आपलं स्थान पक्के केल्यामुळे आयपीएल फायनल गाठण्यासाठी दोन्ही संघांना २ संधी मिळतील. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. विजयी संघाला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी असेल.

  • एलिमिनेटर हा सामना आयपीएल गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स संघांमध्ये २५ मे रोजी होणार आहे. पराभूत संघाला आयपीएलमधून पॅकअप करावं लागणार आहे.

  • क्वालिफायर २ २७ मे अहमदाबाद आयपीएल क्वालिफायर १ मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर लढतीतील विजयी संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत संघाला पॅकअप करावं लागणार आहे.

  • अंतिम सामना २९ मे रात्री ८ वाजता क्वालिफायर १-२ मधील विजेता संघ आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांशी भिडतील.

  • राजस्थान रॉयल्स आयपीएल उद्घाटन पर्वाचे विजेते प्रवास २००८, २०१३, २०१५, २०१८, २०२२ बाद फेरीत २००८ साली शेन वॉर्नच्या नेतृत्वात विजेतेपद .

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर प्रवास २००९, २०१५, २०२०, २०२१, २०२२ बाद फेरीसाठी पात्र अद्याप ३ वेळा उपविजेता.

  • लखनऊ सुपरजायंट्स प्रथमच बाद फेरीत स्थान विजेतेपदासाठी यंदाचा प्रबळ दावेदार.

  • गुजरात टायटन्स प्रथमच बाद फेरीत स्थान विजेतेपद पदासाठी सर्वाधिक संधी.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com