IPL 2022 : हैद्राबाद-कोलकाता आज निर्णायक लढत

IPL 2022 : हैद्राबाद-कोलकाता आज निर्णायक लढत

पुणे | Pune

केन विलिअमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघ आज पुण्याच्या एमसीए मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाशी सामना करणार आहे...

बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. मात्र हैद्राबादविरुद्ध सामन्यापूर्वी कोलकाता संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघाचा स्टार गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL) बाहेर पडून मायदेशी परतला आहे. बाद फेरी निश्चित करण्यासाठी हैद्राबाद संघाला तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे.

IPL 2022 : हैद्राबाद-कोलकाता आज निर्णायक लढत
Visual Story : ११ वर्षानंतर शर्मिला टागोर बॉलिवूडमध्ये; 'या' चित्रपटात झळकणार

दोन्ही संघाच्या खात्यात १० गुण आहेत. मात्र सरस धावगतीच्या बळावर हैद्राबाद (SRH) सहाव्या तर कोलकाता (KKR) सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आयपीएलमध्ये २२ सामन्यांमध्ये एकमेकांशी भिडले आहेत. यात कोलकाताने १४ तर हैद्राबाद संघाने ८ सामन्यांमध्ये विजय साकारला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) दोन्ही संघांमध्ये दुसरा सामना होणार आहे. पहिल्या साखळी सामन्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघाने ७ विकेट्सने कोलकाताला पराभूत केलं होतं.

या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कोलकाता आज पुण्याच्या मैदानावर उतरणार आहे. आजच्या सामन्यात केन विलियम्सन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर, नितीश राणा हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com