IPL 2022 : आज हैद्राबाद-कोलकाता आमनेसामने

IPL 2022 : आज हैद्राबाद-कोलकाता आमनेसामने

मुंबई | Mumbai

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचे ५ सामन्यांमध्ये ३विजय आणि २ पराभवांसह ६ गुण आहेत. आज सनरायझर्स हैद्राबादवर (sunrisers hyderabad) मात करून अव्वल २ स्थानामध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी केकेआर (KKR) सज्ज आहे.....

तर दुसरीकडे हैद्राबाद संघाचे ४ सामने झाले असून, यात त्यांनी २ विजय आणि २ पराभवांसह ४ गुणांची कमाई केली आहे. सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्सला (GT) पराभवाची धूळ चारली आहे.

मात्र आजच्या सामन्यापूर्वी हैद्राबाद संघाला धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे २ सामन्यांना मुकणार आहे. त्याच्याजागी श्रेयस गोपाळ याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

कोलकाता संघाला दिल्लीविरुद्ध सामन्यात ४४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. आता हा पराभव विसरून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी कोलकाता सज्ज आहे.

हैद्राबाद संघाप्रमाणे कोलकाता संघातही बदल केला जाण्याची शक्यता आहे. सलामीवीर व्यंकटेश अय्यरसोबत एरन फिंचला अंतिम ११ मध्ये अजिंक्य रहाणेच्या जागी संधी मिळू शकते. याशिवाय शेल्डन जॅक्सनला सॅम बिलींग्जच्या जागी संधी मिळू शकते.

हैद्राबाद आणि कोलकाता आतापर्यंत एकूण २१ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात कोलकाताने १४ तर हैद्राबादने ७ विजय संपादन केले आहेत.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.