IPL 2022 : हैद्राबाद-दिल्ली आज आमनेसामने, कुणाचे पारडे जड?

IPL 2022 : हैद्राबाद-दिल्ली आज आमनेसामने, कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

युवा यष्टीरक्षक कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आज सायंकाळी ७:३० वाजता केन विलिअमसनच्या सनरायझर्स हैद्राबादशी (Sunrisers Hyderabad) सामना करणार आहे...

हा सामना मुंबईच्या सीसीए ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. हैद्राबादविरुद्ध (SRH) विजयी चौकारासाठी दिल्ली कॅपिटल्स (DC) सज्ज झाला आहे. यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामातील दोन्ही संघांचा पहिला सामना असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ३ सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. आजच्या सामन्यात विजयासाठी दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे. तर हैद्राबाद संघाने या मैदानावर दोन सामने खेळले आहेत.

या दोन्ही सामन्यांमध्ये हैद्राबाद विजयी झाला आहे. हैद्राबाद (SRH) आणि दिल्ली (DC) आतापर्यंत एकूण २० वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यात दिल्लीने ९ तर हैद्राबादने ११ विजय मिळवले आहेत.

सुरुवातीचे २ सामने गमावलेल्या हैद्राबाद संघाने संथ सुरुवात करणाऱ्या आता आपली विजयी मोहीम कायम ठेवताना गुणतालिकेत अव्वल ४ संघांमध्ये धडक मारली होती.

मात्र बुधवारी झालेल्या चेन्नईविरुद्ध (CSK) सामन्यात बंगळूर संघाने चेन्नईचा १३ धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. आता अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी हैद्राबाद (SRH) आज विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे.

हैद्राबाद आणि दिल्ली संघाची तुलना केल्यास हैद्राबाद अधिक संतुलित दिसत आहे. संघाचे गोलंदाज आणि फलंदाज फॉर्मात आहेत. याचा निश्चित फायदा हैद्राबाद संघाला होताना दिसत आहे.

हैद्राबाद संघाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज अभिषेक शर्मा याने यंदाच्या हंगामात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तो आरामको ऑरेंज कॅपच्या अव्वल ५ फलंदाजांच्या यादीत सामील आहे. तसेच मधल्या फळीतील फलंदाज एडन मार्करमच्या नावावर २६३ धावा जमा आहेत.

राहुल त्रिपाठीही चांगल्या फॉर्मात आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास उमरान मलिकच्या ९ सामन्यांमध्ये १५ विकेट्स आहेत. भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी संघासाठी महत्वाची ठरत आहे.

दिल्ली संघाची नजर आता आपली गुणतालिकेतील आगेकूच अशीच कायम ठेवण्यावर लागली आहे. दिल्ली संघाचे ९ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ३ पराभवांसह ८ गुण आहेत पण सरस धावगतीच्या बळावर दिल्ली सातव्या स्थानावर आहे.

आज हैद्राबादला पराभूत करून पाचव्या विजयासाठी दिल्ली सज्ज असणार आहे. दिल्ली संघाच्या फलंदाजीची मदार सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरवर असणार आहे. गत २ सामन्यात पृथ्वी शॉ ची बॅट तळपलेली नाही.त्याच्याकडून दिल्ली संघाला मोठी खेळी अपेक्षित आहे.

याशिवाय कर्णधार रिषभ पंत धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव आणि खलील अहमदची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेलकडून संघाला चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे. आजच्या सामन्यात डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, केन विलियम्सन, अभिषेक शर्मा आणि उमरान मलिक स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.